लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 मद्यविक्री अनुज्ञप्ती राहणार निकाल जाहीर होईपर्यंत बंद

जालना/प्रतिनिधी,दि.3
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 ची मतमोजणी दि. 4 जुन, 2024 रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने आदेशान्वये दि. 4 जुन, 2024 रोजीच्या आदेशानूसार मतमोजणीच्या दिवशी संपुर्ण जिल्ह्यामध्ये संपुर्ण दिवस कोरडा दिवस जाहीर करण्यात आला होता. तथापि, महेश एस. शेट्टी व नवी मुंबई हॉटेल असोसिएशन यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केले होते. या रिट पिटीशनमध्ये उच्च न्यायालय, मुंबई यांनी पारित केलेल्या आदेशानूसार या कार्यालयाच्या दि. 3 एप्रिल, 2024 रोजीच्या आदेशामध्ये खालीलप्रमाणे अंशतः बदल करण्यात आला आहे. बदलानूसार दि. 4 जुन, 2024 रोजी जालना लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीचा निवडणुक निकाल जाहीर होईपर्यंत संपुर्ण जालना जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद राहतील. या आदेशाची जालना जिल्ह्यातील सर्व संबंधित अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत किंवा सदर आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 (1) (सी) नूसार आवश्यक कारवाई करण्यात येईल. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.