आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी दत्ता पाटील हडसणीकर यांची प्रकृती खालावली.
हदगांव/प्रभाकर डुरके,दि.8
मराठा आरक्षण बाबत राज्य सरकारने आतापर्यंत कोणता ही निर्णय न घेतल्याने.हदगांव तालुक्यातील भूमिपुत्र मराठा सेवक दत्ता पाटील हडसणीकर यांनी आरक्षणाचा लढा देण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून.दिनांक ०३/०७/२०२३ पासून त्यांच्या हडसणी या मूळगावी आमरण उपोषणाला सुरुवात केली.आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला असून.प्रकृती खालावल्याने त्यांना आज शासकीय उपजिल्हा रुग्णालय हदगांव येथे दाखल करण्यात आले.यावेळी मराठा आरक्षणासाठी अतिंम व निर्णायक लढा देत असून.आता कुठले ही आश्वासन न घेता.प्रत्यक्षात मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय आमरण उपोषणातुन कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही.असे दत्ता पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत मुख्यमंत्री यांना मागण्यांबाबत चे निवेदन देण्यात आले.दत्ता पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, मागील वर्षी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसलो, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी लवकरच मराठा आरक्षणाची बैठक घेऊ.असे आश्वासन दिले होते.त्यावेळी मुख्यमंत्री यांच्या शब्दावर विश्वास ठेवून.उपोषणातून माघार घेतली होती.परंतु त्या बैठकी नंतर आतापर्यंत अनेक बैठका झाल्या.पण ऐका ही बैठकीत मराठा आरक्षण बाबत निर्णय न फक्त सवलतीवरच मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम राज्य सरकारने केलेले असून.मराठा आरक्षण चा प्रश्न प्रलंबित ठेवून.राज्य सरकारने शासकीय मेगा नोकर भरती ची प्रक्रिया सुरू केली होती.तेव्हा देखील मी हदगांव ते मुंबई अशी अनवाणी पदयात्रा पुर्ण करुन.राज्य सरकारने आगोदर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे.व त्या नंतरच शासकीय मेगा नोकर भरती करावी.या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री साहेबांना मुंबई येथील वर्षा बंगला या शासकीय निवासस्थानी दिले होते.तरी देखील राज्य सरकार ने शासकीय नोकर भरती सुरूच ठेवून मराठा समाजाला शासकीय सेवेतून हद्दपार करण्याचा विडाच उचलला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे.तसेच आरक्षणाचा प्रश्न सोडविल्या शिवाय शासकीय नोकर भरती न करता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.तोवर नोकर भरती ला तात्काळ स्थगिती देण्यात यावी.व मी आतापर्यंत दिलेल्या निवेदनातील मागण्यांबाबत राज्य सरकार कडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे लेखी पत्र मुख्यमंत्री साहेबांनी स्व:ता उपोषण स्थळी घेऊन आल्यानंतरच मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आमरण उपोषण सोडण्यात येईल.असे दत्ता पाटील हडसणीकर यांनी बोलतांना सांगितले.असून दत्ता पाटील यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री साहेब काय निर्णय घेतील.याकडे सकल मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.