जालना येथे शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर
समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीरास प्रारंभ ०७ फेब्रुवारी पर्यंत राहणार शिबीराचे आयोजन

जालना/प्रतिनिधी, दि.3
जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीराचे आयोजन दिनांक ०३.०२.२०२५ ते दिनांक ०७.०२.२०२५ पर्यंत रोजी सकाळी ०६.०० ते ७.३० या वेळेत स्व. कल्याणराव घोगरे स्टेडियम या ठिकाणी केले जाणार आहे.
सदरील शिबीरास आज दिनांक ०३.०२.२०२५ पासुन प्रारंभ सुरुवात झाली. यावेळी जालना मनपाचे आयुक्त तथा प्रशासक श्री. संतोष खांडेकर यांनी दिपप्रज्वलन केले. सदर शिबरामध्ये पतंजली योग समितीसह राज्य प्रभारी योग शिक्षक प्रल्हाद माऊली हरबक, माजी उपाध्यक्ष श्री. राजेश राउत, माजी नगरसेविका श्रीमती संध्या संजय देठे, अतिरिक्त आयुक्त श्रीमती प्रीयंका राजपुत, उपायुक्त नंदा गायकवाड, सहायक आयुक्त सुप्रीया चव्हाण, सहायक आयुक्त अपर्णा जाधव, कार्यालयीन अधिक्षक श्री. विजय फुलंब्रीकर, मालमत्ता विभाग प्रमुख श्री. राहुल देशमुख, स्वच्छता विभाग प्रमुख श्री. पंडीत पवार, अभियंता श्री. अशोक कटारे, लिपीक श्री. संजय भालेराव, श्री. मोहन जामदार, बंडु चव्हाण, अजय पेंबार्ती तसेच मनपातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सदर शिबीरास पोलीस प्रशिक्षण केंद्र कार्यालय, जालनाचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
तरी जालना शहर महानगरपालिकातर्फे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सदरील योग शिबीर उपस्थित राहुन शिबीराची शोभा वाढवावी