कागद पत्रांची पुर्तता करणाऱ्या मुस्लिम बांधवांना जन्म नोंदणी आदेश प्रमाणपत्र देन्यात यावे
अल्पसंख्याक राष्ट्रवादी- काँगेसचे भोकरदन तालुका अध्यक्ष शेख समद यांची तहसीलदारांकडे मागणी

भोकरदन/संजीव पाटील,दि.3
भोकरदन-जाफ्राबाद तालुक्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या व इतर समाजसाठी ग्रामपंचायत व नगर परिषद मध्ये चुकून जन्माची नोंद न करणाऱ्या अर्जदारास तहसीलदार भोकरदन यांनी योग्य ती कागपत्रे तपासून जन्म नोंदणीसाठ ग्रामसेवक,मुख्याधिकारी यांना आदेश द्यावे,असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे भोकरदन तालुका अध्यक्ष समद भाई सुरंगलीकर यांनी भोकरदन तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भोकरदन तहसील कार्यालयातुन बांगलादेशी नागरिक जन्म प्रमाणपत्र मिळवुन इथे वास्तव करीत असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे राज्य सरकारने उशीरा ने जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्यास स्थगिती दिली आहे. उशिराने जन्म प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाकडे
अनेक तक्रारी दाखल झाल्या . या तक्रारीची चौकशी करण्यासाठी गृह विभागाकडून विशेष तपासणी पथक एस.आय.टी. ची स्थापना करण्यात आली आहे .या पार्श्वभूमीवर जन्म मृत्यु प्रमाणपत्र वितरित करण्यास पुढील आदेशापर्यंत शासनाने मनाई केली आहे या स्थगिती मुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलानं बरोबर मुस्लिम समाजातील पवित्र हजला जाण्यासाठी पासपोर्ट काढण्यासाठी जन्म नोंदणी प्रमाणपत्राची गरज असते परंतु या कामी बऱ्याच लोकांची जन्माची नोंदच नाही.परिणामी या कामासाठी तहसीलदार यांच्या आदेशाने जन्माची नोद घेतली जाते. भोकरदन तहसीलदार यांच्या कडून जन्म- मृत्यू नोंदी साठी आदेश देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या तसेच हजच्या पासपोर्ट साठी जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहे,करीता योग्य त्या कागतपत्राची पूर्तता करणाऱ्या अर्जदारास जन्म नोंद घेण्यासाठी आदेश देण्यात यावे,अशी मागणी या निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष मदनराव तुपे. भोकरदन तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख समद सुरंगली कर ,उपाध्यक्ष अल्प विभागाचे नवाज मिर्जा,शहर अध्यक्ष फईम कादरी,नासेर पठाण,जुनेद पठाण,आदी हाजर होते.