येवला जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थ्यांनी आनंद नगरी भरून 25 हजाराची केली कमाई

गणेश शिंदे, विरेगाव दि.3
घनसावंगी तालुक्यातील येवला
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शनिवारी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने आनंद नगरी भरवून कमवा व शिका, व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घेतला. यात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावले होते. खाद्यपदार्थ घरी बनवून स्वच्छता ठेवून बासुंदी, समोसे, चिवडा, चहा, पोहे, पाणीपुरी, डोसा, अनेक पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते.
यावेळी आनंद नगरीचे उद्घाटन सरस्वती भवन शाळेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामा तांगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पिराजी तांगडे होते. ४० स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी २५ हजाराची कमाई केली. आनंद नगरीला सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी भेटी देऊन खरेदी केली. विद्यार्थ्यांनी आनंद नगरीमध्ये केलेल्या कमाईचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी मुख्याध्यापक शामराव टेकाळे, विष्णू पाटील आदी उपस्थित होते.