pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कुंभकर्ण,शासन,प्रशासनास स्व ईच्छा मरण्याच्या परवानगीसाठि चारशे दिव्यांग नांदेड जिल्हाअधिकारी कार्यालय धरणे

0 1 7 3 4 1

नांदेड/प्रतिनिधी,दि.3

दिव्यांगासाठि शासन प्रशासन 3 डिसे. जागतिक दिनी अनेक दिव्यांगाच्या सवलती जाहिर करून त्यांचा गौरव केला जातो.
पण शासन,प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आज दि.2 डिसे.2023 पासुनअनेक प्रश्नासाठि संघर्ष करून दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावे म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली
दिव्यांगाना हक्क द्या नसेल तर मरण्याची परवानगी मिळेप्रर्य़त
बेमुध्दत धरने आंदोलन चालु असुन अनेक संघटनेनी पाठिंबा देऊन संताप व्यक्त केला.
ज्या दिव्यांगाना दिसत नाही,ऐकु येत नाहि,बोलता येत नाहि,चालता येत नाहि अशा
दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठि
जिल्हाअधिकारी नांदेड यांना
पंचविस महिण्यात ४3 निवेदन, सहा वेळा मोर्चे, ४ वेळा धरने आंदोलन अनेक वेळा चर्चा करून मुध्दत देऊन न्याय हक्क मिळत नसल्यामुळे लोकशाहि दिनात न्याय मिळेल म्हणुन निवेदन देऊन पंचविस महिने दिव्यांगाना न्याय व साधे ऊतर देता येत नसेल तर लोकशाहि दिन कशासाठि?दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारि अभियानात लाखो रूपये खर्च करून दिव्यांगाना काय न्याय मिळेल?व दिव्यांगाना हक्क मिळत नसेल तर दिव्यांग दिनात घोषणेचा वर्षाव कशासाठि ? मा.जिल्हाअधिकारी नांदेड
यांनी आपल्या कक्षात दहा महिन्यांत पाच वेळा दिव्यांग संघटनेच्या व ,संबंधित अधिकाऱ्या सोबत बैठक घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांना दि.15 फ्रेबु.2022 पर्यंतचा कालावधी देऊन न्याय तर नाहि साधे उत्तर देत नसतील तर जिल्हाअधिकाऱ्याच्या बैठकिला व आदेशाला काय महत्व आहे? जिल्हाअधिकाऱ्यानी आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यावर कार्यवाही का करत नाहित? दिव्यांग कमकुवत असल्यामुळे सक्षम व्यक्ती त्यांच्या संपत्तीवर ताबा घेत असल्यास त्या दिव्यांगानी पोलिस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर सहा महिने कोणतेही कार्यवाही का करत नाहित दिव्यांग कलम 92 ची कार्यवाही न करता सात महिन्यांनंतर 107ची कार्यवाही करून चार महिने तहसिलदार कि हजर केले जात नाहि?
अशा पंधरा प्रश्नासाठि दिव्यांग जागतिक दिनी दिव्यांगास हक्क देता नसेल आम्हा दिव्यांगाना जिवन जगत असताना जनावरा प्रमाणे जिवन जगने सहन होत नसल्यामुळे शासनाने दिव्या़गाना हक्क द्यावा नसेल तर स्वईच्छा मरन्याची परवानगी मिळेप्रर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे ऑफिस वेळात बेमुदत धरने आंदोलनात दिव्यांग,वृध्द,निराधार बांधवांना आपल्या हक्कासाठी दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाक़ोरे पाटिल यांना कॉ.गंगाधर गायकवाड,वकिल संघटनेचे व स्वतंत्र भारत पार्टिचे जिल्हा अध्यक्ष ऑड धोंडीबा पवार यांनी पांठिबा दिला.
या धरने आंदोलनात सोहळाही तालुक्यातील अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते
,ज्ञानेश्वर नवले,सुधाकर पिलगुंडे,राजाभाऊ शेरकुरवार, अनिल रामदिनवार, प्,विठ्ठल माने,मगदुम शेख,चादराव चव्हाण,मानसिंग वडजे,बालाजी जाधव,धनगरे,अबाराव पाटिल,विठ्ठल बेलकर,
नामदेव बोडके,बाबु पवार,अंनिस बेग, इत्यादी शेकडो बांधव उपस्थित होते असे प्रसिध्दी पत्रकात दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे