उरण क्रिकेट समलोचक असोसिएशन च्या वतीने विद्यार्थिनींना अर्थसाह्य.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19
जासई हायस्कूल मध्ये उरण समालोचक उरण क्रिकेट समलोचक असोसिएशन च्या वतीने विद्यार्थिनींना अर्थसाह्य. शैक्षणिक अर्थ साह्य योजनेचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.इयत्ता १२ वी मध्ये शिकत असलेल्या उरण तालुक्यातील एकुण १३ मुलींना १,३०,०००/- रु. (एक लाख तीस हजार रु.) रकमेच वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.ह्या कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत चिरलेचे सरपंच सुधाकर पाटील (काका पाटील), ऑलइंडियापोर्ट डाॅक वर्कस कामगार नेते सुरेश पाटील, रवी घरत(कामगार नेते), जासई हायस्कूल चे प्राचार्य अरुण घाग, गुरुनाथ तांडेल, मयुर माणीकशेठ म्हात्रे (प्रो.प्रा. मयुर सिक्युरिटी फौर्स),कु. आदित्य घरत(ग्रा.स.जासई), कु.यश म्हात्रे, मनिषा घरत(भा.ज.पा. महिला अध्यक्ष जासई),सुमन म्हात्रे (क्रांती महील मंडळ अध्यक्ष), विना घरत (ग्रा.स.जासई) , सृष्टी म्हात्रे(ग्रा.स. जासई),जयश्री ठाकुर (ग्रा.स. जासई),नंदा म्हात्रे(राजगड जि.भा.ज.पा. महिला सदस्य),संध्या रविंद्र पाटील (ग्रा.स. नवघर), रविंद्र पाटील (नवघर)इ. मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगड भुषण नितेश पंडित यांनी आपल्या सुमधूर वाणीतुन केले.कार्यक्रमाची प्रस्तावना उरण समालोचक असोसिएशन चे अध्यक्ष प्रसाद भोईर यांनी केले.तर आभार प्रदर्शन संस्थेचे सल्लागार आत्माराम म्हात्रे यांनी केले.असोसिएशन चे खजिनदार प्रल्हाद कासुकर, सचिव मेघनाथ मढवी, उपाध्यक्ष विपुल पाटील, सदस्य जयदास ठाकुर, प्रकाश ठाकुर, नवनाथ म्हात्रे हितेश म्हात्रे, सचिन केणी, प्रविण म्हात्रे, सुनिल पाटील,कैलास पाटील, विनोद घरत , विराज मढवी या सर्वांनी पाहुन्यांच स्वागत केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य अरुण घाग यांनी भुषवले.उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोदयातुन उरण समालोचक असोसिएशनच्या सामाजिक कार्याचं भरभरुन कौतुक केले व पुढील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.