श्री स्वामी समर्थ भक्त परिवारांचा महासत्संग सोहळ्यांचे आयोजन

आनिल वाढोणकर/छ.संभाजीनगर,दि 11
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये असलेल्या दिवशी येथे श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक मार्ग दिंडोरी प्रणित महासत्संग सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रम मंडपाचे काम युद्धपातळीवर चालू असून लाखो सेवेकरी व भाविक भक्त या धार्मिक सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत लाखो भाविक सेवेकरांच्या उपस्थितीत अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत भव्य महासत्संग मेळावा व सकतकार्य सिद्धीकारक श्री चक्रराजपूजन व श्री यंत्राचे पूजन होणार आहे गंगापूर तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावरील दिवशी या ठिकाणी हा भव्य सोहळा होणार आहे या सोहळ्यांच्या अयोजना संदर्भात जोरदार तयारी सुरू असून चाळीस एकरात हा धार्मिक सोहळा होणार आहे तयारीची पाहाणी मराठवाडा प्रतिनिधी विलासराव देशमुख यांच्यासह छत्रपती संभाजी नगर बीड जालना जिल्हा प्रतिनिधी व सेवेकरी व गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र नितीन भाऊ मोरे यांनी या कार्यक्रमाची पाहणी केली या सोहळ्याला येणारे सेवेकरी व भाविकांना कुठलेही अडचण येऊ नये यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात येत आहे सोहळ्याला भव्य मंडप उभारण्यात येत आहे या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात येत असून कार्यक्रमाला येणाऱ्या सेवेकऱ्यांना पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी नियोजन केले जाणार आहे तसेच बाहेरगाहून येणाऱ्या महिला व पुरुष सेवेकऱ्यांसाठी स्वच्छता ग्रहाची व्यवस्था करण्यात येत आहे या सोहळ्याला छत्रपती संभाजीनगर जालना बीड येथून लाखो सेवेकरी उपस्थित राहणार आहेत