ब्रेकिंग
जासईच्या क्रांती महिला मंडळाला महेंद्रशेठ घरत यांची एक लाखाची देणगी

0
3
1
8
8
7
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
उरण तालुक्यातील जासई येथील क्रांती महिला मंडळाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी एक लाखाची देणगी दिली. या देणगीचा वापर क्रांती महिला मंडळ आपल्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी करणार आहे, असे क्रांती महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमन गजानन म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी जासई ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच नीरा आकाश म्हात्रे, जासई काँग्रेस महिला अध्यक्षा वंदनाताई पाटील, प्रभावती घरत यांनी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासमवेत विवेक म्हात्रे उपस्थित होते.
0
3
1
8
8
7