pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारा महसूल हा महत्त्वाचा विभाग – पालकमंत्री अतुल सावे

महसूल पंधरवडा सांगता समारोह संपन्न

0 3 1 8 7 5

जालना/प्रतिनिधी,दि.15

महसूल विभाग शासनाच्या विविध योजना, उपक्रम प्रभावीपणे राबविते. जालना महसूल प्रशासनाने मागील वर्षात व महसूल पंधरवडयात अतिशय उत्तम काम केले आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारा महसूल हा महत्त्वाचा विभाग आहे. महसूल पंधरवाड्यात शासनाचे विविध उपक्रम यशस्वीपण राबविल्याबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

महसूल पंधरवडा सांगता समारोह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात आज आयोजित करण्यात आला होतो. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, नम्रता चाटे, मनिषा दांडगे, सरिता सुत्रावे आदींसह महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, महसूल दिन दरवर्षी 1 ऑगस्टला साजरा केला जातो. यानिमित्ताने शासनाने सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाच्या माध्यमातून विविध सेवांचा लाभ मिळावा म्हणून या वर्षी महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला. या पंधरवाड्यात जालना महसूल विभागाने अतिशय छान काम केले. या काळात शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना जसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना घराघरात पोहोचविल्या. अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले. सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वय व एकजुटीने काम केले. याबद्दल आपले अभिनंदन. तसेच अनेक आव्हानात्मक काम करत असताना महसूल विभागाला पोलीस प्रशासनाचीही नेहमीच चांगली साथ मिळते. याबद्दल पोलीस प्रशासनाचेही अभिनंदन. यापुढेही या विभागांनी उत्तम काम करत राहावे व जनतेला तत्परतेन चांगली सेवा द्यावी.

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. या विभागामार्फत जनतेला अनेक सेवा दिल्या जातात. वर्षभरात या विभागाने शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना, उपक्रम यशस्वीपणे राबविले. महसूल पंधरवाड्यात जिल्ह्यात शिबीर व मोहिमेच्या माध्यमातून लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची जिल्हयात यशस्वीपण अंमलबजावणी करण्यात आली आहे. इतर योजनाही प्रभावीपणे राबविण्यात महसूल विभाग आघाडीवर आहे. वर्षभरात अनेक आव्हानांवरही यशस्वीपणे मात करण्यात आली. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये चांगला समन्वय व कामाची प्रति सकारात्मक भाव असल्यामुळे कामे जलदगतीने करण्यात आली. भविष्यातही महसूल विभाग अधिकपणे चांगले काम करीत राहील.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना म्हणाल्या की, सर्व विभागाशी समन्वयाने काम करणारा महसूल हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे केली जातात. इतर विभागांनाही सहकार्य करणारा हा महत्त्वपूर्ण विभाग आहे.

प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वायाळ यांनी महसूल पंधरवड्यात आणि  वर्षभरात महसूल विभागाने केलेली लोकोपयोगी कामांची माहिती दिली. जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारा महसूल हा प्रशासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण योजनांची या विभागाचे अधिकारी-कर्मचारी यशस्वीपणे अमंलबजवणी करतात, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत विविध विभागात नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीपत्र देण्यात आले. तलाठी व कोतवाल पदभरतीत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात आला. समृध्दी महामार्ग भूसंपादनपोटी संबंधित व्यक्तींना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 8 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे