9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांती दिनी दिव्यांग वृध्द निराधार आपल्या हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे यल्गार मोर्चा व तिव्र आंदोलनात क्रांती करावी चंपतराव डाकोरे पाटील कुंचलिकर

नांदेड/प्रतिनिधी,दि.25
देशाला स्वतंत्र मिळून 76 वर्ष पूर्ण झाले तरी दिव्यांग वृध्द, निराधाराना न्याय हक्क मिळत
नसल्यामुळे दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र व बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति संघर्ष समिती नांदेड यांच्या संयुक्त
पणे दिव्यांग, वृध्द निराधार बांधवाचा दि.९ ऑगस्ट 2024 रोजी क्रांती दिनी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे तिव्र एल्गार मोर्च्याने दिव्यांग, वृध्द निराधारानी क्रांती घडवावी असे अव्हाहन चंपतराव डाकोरे पाटिल,राहुल साळवे यांनी केले.
शासनाच्या विविध कल्याण कारी योजनेसाठी अनेक वेळा दिव्यांगासाठी कायदे करून तेच कायदे करणारे लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी दिव्यांगाना हक्कापासून वंचितच ठेवतात. ज्या दिव्यांगाना चालता येत नाही, बोलता येत नाही, जगात काय चालले ते दिसत नाहि ,ऐकू येत नाही आणि आपले दु:ख सांगण्यासाठी बोलता येत नाहि.अशा दिव्यांगासाठी केलेला कायदा शासन ,प्रशासन त्यांची अंमलबजावणी करीत नसल्यामुळे त्यांची अंमल बजावणी व्हावी म्हणून दिव्यांग संघटनांनी अनेक वेळा, निवेदन ,धरणे आंदोलन उपोषण मोर्चे निवेदन,दिल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत सरांनी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,व संबंधित अधिकारी यांची सहा वेळा बैठक घेऊन कनिष्ठाला आदेशित व लेटरहेड वर मुध्दत देऊन प्रश्न निकाली न निघाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही कराण्यात येईल असे आदेशित करुन दोन वर्षांत दिव्यांगाचे प्रश्न सोडलणुक झाली नाहि निवेदनाचे साधे ऊतर दिले नाहि दोषि अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही झाली नाही.
दिव्यांग कायदा दप्तर दिरंगाई कायद्याने दोषि अधिकाऱ्यावर दप्तर दिरंगाई कायद्याने कार्यवाहि का होत नाहि.?
महाराष्ट्राच्या शेजारच्या आंद्रा प्रदेश मध्ये दिव्यांगाना दरमहा सहा हजार मिळते तर महाराष्ट्रात का मिळत नाहि, दिव्यांग, वृध्द निराधाराना, शेतमजुरी करणाऱ्यांना शासकिय सवलतीसाठी उत्पन्नाची अट असते,तर खासदार,आमदार,
प्रशासकिय अधिकारी यांना उत्पादनाची अट का नसते.
अशा अनेक प्रश्नांसाठी दिव्यांग, वृध्द निराधारानी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान चंपतराव डाकोरे पाटिल,राहुल साळवे, ज्ञानेश्वर नवले, अब्दुल माजिद,राजुभाऊ शेरकुरवार, नागोराव बंडे,कार्तिक,
मगदुम शेख, नामदेव बोडके, दतात्रय सोनकांबळे, अनिल रामदिनवार,उमेश भगत, विठ्ठल बेलकर, बालाजी होनपारखे, दिंगाबर लोणे,यलदे,शेख हानिफ,माधव,घोरबांड शिवाजी, दादाराव कांबळे,राजेषसुकळकर, शंकर म्हैत्रे, इत्यादी कार्यकर्त्यांनी केले.