ब्रेकिंग
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वाहनाचे निर्लेखन
0
3
1
8
6
8
जालना/प्रतिनिधी,दि.07
जालना येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील शासकीय मोटर वाहन क्रमांक एम. एच. 12 पीए 4292 जीप महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा मार्शलचे आयुष्यमान 25 वर्षे झाल्यामुळे निर्लेखित करण्यात येत आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांच्याकडून या शासकीय वाहनाची भंगार किंमत रुपये 35 हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तरी इच्छुक अधिकृत खरेदीदारांनी किंवा संस्थेने दि. 16 जानेवारी 2025 पर्यंत दूपारी 3 वाजेपर्यंत या कार्यालयाशी संपर्क साधून शासकीय वाहन लिलावाद्वारे भंगारामध्ये खरेदी करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0
3
1
8
6
8