जासई विद्यालयात आदरणीय लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांची जयंती उत्साहात संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई या विद्यालयात आदरणीय लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. विद्यालय परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना व हुतात्मा स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून लोकनेते दि.बा. पाटील साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालखीतील प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कामगार नेते सुरेश पाटील,विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ जगे,जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत,दि.बा. पाटील साहेबांचे सुपुत्र अतुल पाटील, अविशेठ पाटील,नरेश घरत इत्यादींनी केले. पालखी मिरवणूक लेझीमच्या पथकाने उत्साहात संपूर्ण जासई गावातून काढण्यात आली. याप्रसंगी व्हाईस चेअरमन डी. आर. ठाकूर, बाबुराव मढवी, गोपीनाथ ठाकूर, यशवंत घरत, विनोद म्हात्रे ,गोपी म्हात्रे, सुभाष घरत, माई म्हात्रे, विद्यालयाचे प्राचार्य संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग ,उपमुख्याध्यापिका एस एस पाटील ,रयत सेवक संघाचे समन्वयक नुरा शेख, गुरुकुल प्रमुख ठाकरे सर ,दहागाव परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विद्यालयातील सर्व सेवक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दि.बा. पाटील साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.