पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त “अहिल्या वृक्ष” लावून अहिल्या मातेच्या महान कार्यास अभिवादन!

अंबड/प्रतिनिधी, दि.13
आज (दि.13) रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त अहिल्या मातेच्या महान कार्याचा जागर करत जगविख्यात कार्यास, पावन पवित्र स्मृतींना शतशत नमन केले!
स्मृतिदिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापित केलेल्या मत्स्योदरी देवी मंदिराच्या पावन भूमीमध्ये उपयोगी वडाचे झाड “अहिल्या वृक्ष” म्हणून लावण्यात आले.आणि सांगण्यास अभिमान वाटतो की,एमबीबीएस प्रवेश पात्र ठरलेली धनगर समाजाची विद्यार्थिनी कु.अनुजा भोंडवे हिच्या हस्ते अहिल्या वृक्ष लावण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निस्वार्थ भावनेतून संपूर्ण भारतभर केलेले अद्भुत,अद्वितीय महान कार्य आजही समाज उपयोगी,लोककल्याणकारी ठरते त्यांच्या महान कार्यास नमन म्हणून “अहिल्या वृक्ष” अत्यंत भक्ती भावाने लावण्यात आले! भविष्यात अहिल्या वृक्ष समाज उपयोगी ठरण्याबरोबरच, पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयोगी ठरेल!
आणि हीच पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या महान कार्यास वंदना ठरते..!!