तालुकास्तरीय “संविधान दिन” व्याख्यान संपन्न

बदनापूर/प्रतिनिधी, दि.13
आज (दि.13) रोजी गटसाधन केंद्र बदनापूर येथे मा. ॲड श्री गवारे, प्रमुख अतिथी श्री क्षीरसागर दीपक गटशिक्षणाधिकारी क्षीरसागर एन डी. यांच्या अध्यक्षते खाली तालुकास्तरीय संविधान दिनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲडव्होकेट गवारे प्रभाकर यांनी संविधान या विषयावर सविस्तर व्याख्यान तसेच क्षिरसागर दिपक शिक्षक काजळा यांनी संविधाना बदल मार्गदर्शन केले शेवटी क्षीरसागर डी एन गटशिक्षणाधिकारी बदनापूर यांनी भारताने संविधान स्विकारून संविधाना प्रमाणे कामकाज सुरु केले त्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे हे वर्षे संविधान वर्षे महणून साजरे करीत आहोत त्यानिमीत्ताने वेगवेगळे उपक्रम घेवून संविधानाची माहीती घरघर संविधान म्हणून देण्यात येत आहे या व्याख्याना साठी गट समन्वयक श्री जुंबड सर,शिक्षक, विद्यार्थी, पालक, कार्यालयातील सर्व कर्मचारी अंगणवाडी ताई उपस्थित होते.