मुलाला चांगले संस्कार दिल्यावर आई वडिलांची सेवा करतील – डॉ.भगवानबाबा आनंदगडकर

विरेगाव / गणेश शिंदे, दि.23
आपल्या लेकराला चांगले संस्कार द्या. त्याच्यावर चांगले संस्कार असतील तर तुमची परिस्थिती गरिबीची असली तरी आई वडील देव म्हणुन तुमची सेवा करतील. मुलाला चांगले संस्कार दिले नाही तर तो तुम्हाला त्रासच देईल. म्हणून मुलांना चांगले संस्कार द्या असे असा हितोपदेश डॉ.भगवानबाबा आनंदगडकर यांनी दिला.
जालना तालुक्यातील ममदाबाद येथे हरिनाम सप्ताह व कलश रोहन समारंभाची डॉ.भगवानबाबा आनंदगडकर यांच्या किर्तनाने सांगता झाली. यात सकाळी ४ ते ६ काकडा भजन,६ ते १० होम, दुपारी ११ ते १ गाथा भजन,५ ते ७ हरिपाठ रात्री ९ ते ११ हरिकीर्तन नंतर भारुड गवळणी झाले.
शिवचरित्रकार गजानन महाराज गोंदीकर,अमोलानंद महाराज मेहकर यांचे किर्तने झाले. शुक्रवारी सकाळी हनुमान मंदिर कलश रोहनाची धार्मिक पुजा करुन बालयोगी भोले बाबा यांच्या हस्ते कलश स्थापना करण्यात आली. नंतर डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांच्या काल्याचे किर्तनाने सांगता झाली. या सोहळ्यात ६०० महिलांना मूळ पत्रिका देऊन सनमान करण्यात आला. बालयोगी भोलेबाबा यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील घरापुढे रांगोळी काढुन गुढ्या उभाल्या होत्या. यावेळी परिसरातील महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.