ब्रेकिंग
अंजनी फाऊंडेशनच्या वतीने जालना शहरात आज निमंत्रितांचे कविसंमेलन
श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ...

pub-7425537887339079
■ या कवींची साहित्य मेजवानी
या कविसंमेलनात कवी, गझलकार डॉ. राज रणधीर, सुनील लोणकर, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. दिगांबर दाते, अशोक खेडकर, डॉ. सुहास सदावर्ते, कैलास भाले, गणेश खरात, विनोद काळे, कृष्णा कदम, मनिष पाटील, अच्युत मोरे, रेखा गतखणे, छाया जायभाये, ज्योती आडेकर, वैशाली फोके, सुहास पोतदार, शिवाजी तेलंग, प्रा. पंढरीनाथ सारके,अनिता पाठे या कवींच्या बहारदार कविता, गझल, इत्यादी काव्य प्रकाराने रसिकांना साहित्यिक मेजवानी मिळणार आहे.
■ दहा बचत गटाच्या महिलांचा ‘उद्योगिनी सन्मान’
बचत गटाच्या माध्यमातून
उद्योगक्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटाच्या महिलांचा अंजनी फाउंडेशनच्या वतीने ‘उद्योगिनी सन्मान – 2024’ मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. कविसंमेलनातील मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात विद्याज्योत टेक्निकल एज्युकेशन सेंटर मध्ये संगणकाचे 12 महिन्यांचे शिक्षण पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना मोफत संगणक वितरण करण्यात येणार आहे.