pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मेरी माटी मेरा देश कार्यक्रमातंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात अमृत कलशाचे संकलन

0 1 7 7 7 8

जालना/प्रतिनिधी,दि.16

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश कार्यक्रमातंर्गत जालना जिल्ह्यातील जालना शहर महानगरपालिकेसह सर्व नगर परिषदा व नगर पंचायत कार्यालयाच्या अमृत कलशाचे संकलन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.16 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपस्थितांना पंचप्राण शपथ देण्यात आली. जिल्ह्यातील महानगरपालिका व सर्व नगर परिषदा व नगर पंचायतीकडून प्राप्त झालेले अमृत कलश दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहेत. यावेळी उपजिल्हाधिकारी संगिता सानप, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा प्रशासन अधिकारी विक्रम मांडूरके, मुख्याधिकारी विशाल पाटील, मनोज उकीर्डे, अभिलेख परदेशी, धीरज भामरे, प्रितीश मगरे, नायब तहसीलदार तूषार निकम, कार्यालय अधिक्षक रवी सुलाने, सचिन पगारे यांच्यासह नेहरु युवा केंद्र तसेच संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे