समाज उपयोगी उपक्रम राबविणे हा शिवसेनेच्या ध्येयाचा भाग -जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घ्यावा- शहर प्रमुख बाला परदेशी

सिंधीकाळेगाव/ प्रतिनिधी,दि.25
शिवसेनेचा स्थापनेपासूनच पक्षाने समाजकार्यास प्राधान्य दिले. रक्तदान, अन्नदान, गरजूंना मदत, रुग्णवाहिका, आरोग्य तपासणी शिबिरे, शालेय साहित्याचे वाटप असे समाजकार्य हिंदूहृदयसम्राट मा.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या शिकवणुकीतून सातत्याने केले जाते. हेच उद्दिष्ट समोर ठेऊन जालना शहर शिवसेनेच्या वतीने गरजवंत विद्यार्थ्यांना ना नाफा-ना तोटा या तत्त्वावर शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ शोला चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर व संजयजी मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय भरती, राजकुमार दायमा, रावसाहेब राऊत, सुभाष वाघमारे, भरत सांबरे, दीपक रणनवरे, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, शिवसेना सत्तेत असो अथवा नसो मात्र पक्षाच्या वतीने सातत्याने लोकोपयोगी राबविण्यात येतात. त्यामुळेच तरुण वर्ग या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेला असल्याचे ते म्हणाले.
जालना शहर शिवसेनेने राबविलेल्या उपक्रमाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी कौतुक केले. तसेच जालना शहरातील उपक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे शहरप्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक बाला परदेशी यांनी केले यावेळी ते म्हणाले की, दरवर्षी जालना शहर शिवसेनेच्या वतीने ना नफा ना तोटा तत्वावर शालेय साहित्य विक्री हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमामुळे शहरातील अनेक गरजवंत कुटुंबांना काही प्रमाणात का होईना मदत होते. सध्या वाढलेल्या महागाईत पालकांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगून पुढील वर्षापासून मोठ्या स्वरूपात उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
यावेळी विजय शेंदरकर, मनोज मुथा, रवींद्र फुलभाटी, विजय पवार, संजय रत्नपारखे, गोविंद राठोड, विजय बोडले, दीपक भालेराव, गोपी मोहिदे, पवन काजळे, शंभू पाटील, बंडू केळकर, रामेश्र्वर करील, शेख शकील, गणेश लाहोटी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.