दुसरबीड येथे दीड कोटी ने बांधलेल्या मंदिराचे जिर्णोध्दार व अनेक देवतांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

जालना/प्रतिनिधी, दि.10
दुसरबीड येथील जी दोन केशव शिवबी येथे जवळपास 1.50 कोटी च्या मंदीरांचे जिर्णोध्दार व अनेक देवतांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये केशव शिवणी गावचे ग्रामदैवत विष्णुस्वरूप केशवराज महाराज व ज्ञानेश्वर माऊली संत नरहरी महाराज गणपती पार्वती मुक्ताबाई प्रभु रामचंद्र या देवतांचे प्राणप्रतिष्ठा पुजन भक्तीमय वातावरण मध्ये करण्यात आले. मृती प्राणप्रनिष्ठे साठी महामंडलेश्वर साधुसंत यांची उपस्थिती होती. नाशिकचे ब्रम्हवृद यांच्या वेद मंत्रातुन त्रिंदिनात्मक
पंचकुंडी यंज्ञ करण्यात आला. तसेच सालाबादा प्रमाणे केशवराज महाराज स्वसंस्थान येथे मोठ्या उत्सवा मध्ये विविध महात्म्यांचे किर्तन पार पडले, रामनवमिच्या मुख्य पर्वावर राम जन्माच्या व काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगना करण्यात आली. या उत्सवामध्ये अनेक क्षेत्रातील मान्यवर आले होते. मातृतिर्थ सि.राजा मतदार संघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे, तोतारामजी कायंदे, आत्माराम कार्यदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव, यांचे पुतणे योगेश भाऊ जाधव, परळी वैजनाथ येथील उद्योग सुरेश अन्ना टाक, तसेच भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद भाऊ, कि. राजा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी नरवडे व पोलीस कर्मचारी वृंद. तसेच पंचक्रोशीतील अनेक सेवेकरी महिलावृंद व भाविक मोठ्या संख्येने
उपस्थित होते. संस्थांचे विश्वस्त वसंतराव उदावंत व सरपंच विकास आंधळे तंटामुक्ती अध्यक्ष गावचे पोलीस पाटील व इतर राजकीय सामाजिक अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने हजर होती अनेक भाविकांनी या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला व काल्याच्या कीर्तनाने सांगता होऊन महाप्रसादाचा सर्व भाविकांनी आनंद घेतला. वारकरी संप्रदायातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आनंद घेताना दिसले. श्री केशव राजाचे मनमोहक रूप पाहून अनेकांच्या भावमुद्रेतील आनंद ओसंडून वाहत होता. व परिसरातील वारकरी संप्रदाय इतर सर्व भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.