जालना विधानसभेतील दहिफळ तांडा व निरखेडा येथील असंख्य युवकांचा जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश

जालना/प्रतिनिधी,दि.12
केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तथा जालना विधानसभा प्रमुख मा. भास्कर (आबा) दानवे पाटील यांच्या उपस्थितीत जालना तालुक्यातील दहिफळ तांडा व निरखेडा येथील असंख्य युवकांनी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी दहिफळ तांडा येथील लसिराम राठोड, आवाश राठोड, रमेश राठोड, अंकुश राठोड, कृष्णा राठोड, निवास राठोड, सुभाष राठोड, किशोर चव्हाण, प्रवीण चव्हाण, सचिन राठोड, अनिल राठोड, शक्ती राठोड, अशोक राठोड, रोहिदास राठोड, राजाराम एकनाथ जाधव व निरखेडा येथील राजाराम एकनाथ जाधव, विलास अंबादास जाधव, हनुमंत बबनराव जाधव, गजानन शिवाजी जाधव, सिद्धेश्वर पंडितराव जाधव, समाधान कृष्णा जाधव, प्रदीप पाडमुख आदींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे म्हणाले की, भाजपामध्ये आपले हार्दिक स्वागत… येणाऱ्या काळात प्रामाणिकपणे जनतेची सेवा करा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अनेक जनकल्याणकारी योजना मंजूर केल्या आहेत या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला करून देऊन आपल्या गावात एकही लाभार्थी लाभापासूनवंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी व पक्षवाढीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे असे हि सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, स्वीय सहायक गोवर्धन कोल्हे, अर्जुन गेही, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मुकेश चव्हाण, सुखदेव महाराज गोरे, अनिल राठोड, तुकाराम राठोड, बद्रीनाथ भसांडे, अकबर परसूवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.