POCSO कायदा अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन –

जालना/प्रतिनिधी,दि.14
राजुरेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय नानेगाव ता. बदनापूर जि.जालना येथे पोलीस अधीक्षक कार्यालय जालना अंतर्गत POCSO कायदा लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 या अंतर्गत श्री वाहुळे ए जी पोलीस हेडकॉन्स्टेबल पोलीस स्टेशन अंबड यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक अपराधा विषयी केलेले गुन्हे व त्याविषयी होणाऱ्या शिक्षा याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री पाटील सर यांनीही विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी बनवलेले कॅनवास चे विमोचन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अहिरे सर यांनी केले.शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी विद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते*