pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

18-जालना लोकसभा मतदारसंघ   निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावीत — निवडणूक निरीक्षक शैलबाला अंजना मार्टीन

निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाने निरीक्षक समाधानी   मतदार जनजागृतीपर उपक्रमांचे केले कौतुक

0 1 7 7 3 0

जालना/प्रतिनिधी,दि.3

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत जालना लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीची प्रशासनाने अतिशय योग्य प्रकारे तयारी केली आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी दक्षतेने व समन्वयाने पार पाडावी, अशी सूचना 18-जालना लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) शैलबाला अंजना मार्टीन यांनी केली. मतदानासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर उपक्रमांचे यावेळी त्यांनी कौतुक केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवनात आयोजित लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत शैलबाला अंजना मार्टीन बोलत होत्या. यावेळी निवडणूक निरीक्षक (खर्च) सर्वना कुमार के., जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, स्वीप  व इतर सर्व यंत्रणांनी निवडणुकीच्या केलेल्या तयारीबाबत श्री. मार्टिन यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत. कुठेही उणीव राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. संवेदनशील मतदान केंद्रांकडे विशेष लक्ष द्यावे. ज्या ठिकाणी त्रुटी आहेत त्याचे तात्काळ निराकरण करावे. प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. यात ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प, व्हिलचेअर, मतदारांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी शेड व्यवस्था, वैद्यकीय उपचार किट, मदत कक्ष, प्रसाधनगृह, आदीं सुविधा सहायक निवडणूक अधिकारी यांनी आपल्या मतदारसंघात आहेत का, याची खात्री करुन घ्यावी.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविलेले जनजागृतीचे उपक्रम अतिशय स्त्युत्य असून जास्तीतजास्त मतदारांनी मतदान करावे, याकरीता तसेच इव्हीएम यंत्राबाबत अधिक प्रभावीपणे प्रचार प्रसिध्दी करण्याची सूचना करुन श्रीमती मार्टीन म्हणाल्या की, मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्र वेळेत पोहोचविण्याबरोबरच मतदान संपल्यानंतर अतिशय दक्षतेने मतदान यंत्र जमा करण्याची कार्यवाही करावी. निवडणूकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे. सर्वांनी टीमवर्कने काम करावे. यावेळी निवडणूक निरीक्षक (खर्च) सर्वना कुमार के. यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने खर्चाच्या सर्व नोंदी अद्यावत ठेवण्याची सूचना केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जालना लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती सादरीकरणाव्दारे दिली. पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेले पोलीस बंदोबस्ताचे नियोजन व कारवायांबाबत माहिती दिली. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी मतदार केद्रांवर मतदारांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधा आणि मतदानासाठी राबविण्यात आलेल्या विविध जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व सहायक निवडणुक अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे