शासकीय नर्सिंग महाविद्यालयात विशाखा समिती विषयी कार्यशाळा संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.28
शासकीय नर्सिंग महाविद्यालयात दि. 27 फेब्रुवारी रोजी महिला समुपदेशन केंद्रात कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळ विशाखा समिती विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित अध्यक्ष प्राचार्या पार्वती लोडते, प्रमुख पाहुणे स्वयंसेविका दीक्षा घोडके, समुदेशक रोहित म्हस्के, उपप्राचार्य किरण जाधव, पराग जोशी, एकनाथ गावडे, पुष्पलता भालतिलक मिनल कुलकर्णी व इतर स्टाफ तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना रोहित म्हस्के यांनी विशाखा समिती काय ? कशा प्रकारे काम करते ? त्याची मदत कशी घ्यावी ? तक्रार कशी करावी ? महिलांच्या मदतीसाठीच्या शासकीय यंत्रणा तसेच महिला समुपदेशन केंद्राची भुमिका स्पष्ट करण्यात आली. मार्गदर्शन करताना मुलींनी सहन करु नये त्यांनी अन्याय अत्याचार विरुध्द बोलणे खूप गरजेच आहे असे दिक्षा घोडके यांनी मार्गदर्शन केले.