pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वृद्ध आईला भेटून चिकलठाण्याला परत निघालेल्या मजूर महिलेवर दोन नराधमाचा बलात्कार

शेलगाव शिवारातील घटना आरोपी नराधमांची पाच दिवसांच्या कोठडीत रवानगी

0 1 7 3 5 7

विरेगाव/गणेश शिंदे,दि.21

संभाजीनगरजवळील चिकलठाणा येथे राहणारी एक 40 वर्षीय मजूर महिला काल 20 जुलै रोजी वृद्ध आईला भेटण्यासाठी जालन्याजवळील कुंबेफळ येथे गेली होती.
आईला भेटून परत चिकलठाणा येथे जाण्यासाठी कालच सांयकाळी ती संभाजीनगर रोडवरील चौफुलीवर येऊन बसची प्रतीक्षा करीत थांबली होती.
तेवढ्यात भरत वाघ नावाचा एक मोटारसायकलस्वार त्या महिलेजवळ आला व त्याने तुम्हाला कुठे जायचे आहे..? अशी विचारणा केली.
सदर महिलेने चिकलठाणा येथे जायचे असल्याचे सांगितल्याने, त्यानेही मी तिकडेच जात असल्याचे सांगून मी तुम्हाला तिकडे सोडतो, असे सांगून मोटारसायकलवर बसविले.
त्यादरम्यान, सदर महिलेने आपले कुटुंब मजुरी करीत असल्याचे सांगितल्याने त्या मोटारसायकलस्वाराने आपल्या शेलगाव येथील तुकाराम अंभोरे नावाच्या मित्रास शेतकामासाठी सालदार लावायचा असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्याने तुकाराम अंभोरे यास संभाजीनगर रोडवरील शेलगाव फाट्यावर कारसह बोलावून घेतले होते.
अंभोरे याने त्या महिलेस अल्टो कारमध्ये बसवून शेत दाखवण्याच्या नावाखाली आपल्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये नेले होते.
तोपर्यंत पाठीमागून मोटरसायकलवर भरत वाघ हा इसम दारूच्या बाटल्या घेऊन आला होता.
त्या दोन जणांनी दारू पिऊन त्या मजूर महिलेवर आळीपाळीने बळजबरीने बलात्कार करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
त्यानंतर त्या महिलेला नराधमांनी रात्री 8 वाजेच्या सुमारास शेकटा येथे कारमधून नेऊन सोडून पोबारा केला होता. या पीडित महिलेने रात्रीच करमाड पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व प्रकार सांगितला, त्यानंतर करमाड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत रात्रीच तिला सरकारी वाहनातून बदनापूर पोलीस ठाण्यात आणले होते.
बदनापूर पोलिसांनी सदर महिलेच्या तक्रारीवरून मोटारसायकलस्वार भरत रामदास वाघ (रा. चंदनझिरा) आणि तुकाराम अरुण अंभोरे (रा. शेलगाव) या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून, पुढील तपास पिंक मोबाईल पथकाकडे वर्ग केला आहे.
या दोन्ही आरोपींना बदनापूर पोलीस व पिंक पथकाने आज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करून, त्यांना बदनापूर न्यायालयात हजर केले होते.
दरम्यान, न्यायालयाने आरोपींची 25 जुलै पर्यंतच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक मोबाईल पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक मंगल सुडके यांच्यासह सहा. फौजदार प्रेमानंद लालझरे, अंमलदार दिगंबर चौरे, मदन डोईफोडे, सुमित्रा अंभोरे हे तपास करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे