
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
उरण मध्ये विविध खून चोरी, बलात्कार, विनयभंग यासारखे गुन्हे वाढतच चालले असून उरण परिसरातील यशश्री शिंदे खून प्रकरण ताजे असतानाच,उरण तालुक्यातील जासई गावामध्ये थरारक घटना घडली आहे. गावातील दिबा पाटील सभागृहा जवळ असणाऱ्या निर्जन जागी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत आढळून आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास गावातील नागरिकांना जासई गावातील दि बा पाटील सभागृहाजवळ एक प्लास्टिकची गोण आढळून आली. या गोणीतुन दुर्गंध येत होती, नक्की या गोणीत काय आहे? ही पाहणी केली असता, त्यात अज्ञात मृतदेह आढळून आला. यासंदर्भात ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.तब्बल साडेतीन तासानंतर पोलिसांच्या माध्यमातून ही गोण खोलण्यात आली. या गोणीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह असल्याचे आढळून आला आहे.संबंधित व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नाही अज्ञात मृतदेहाचा उरण पोलीस शोध घेत आहेत.उरण तालुक्यातील जासई गावात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय भाडोत्री राहत आहेत. त्यामुळे जासई गाव तसे वर्दळीचे आहे. विशेष म्हणजे दिवस-रात्र गावांमध्ये वर्दळ असून देखील या प्रकारची घटना झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.तसेच नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.