pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महेंद्र घरत यांचा उदारपणा; दिघोडे गावाला रुग्णवाहिका भेट

ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठीच आमचा जन्म - महेंद्र घरत आई दिवंगत यमुना घरत यांच्या स्मरणार्थ दिल्या एकूण १२ रुग्णवाहिका भेट

0 3 1 8 7 1

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10

यमुना सामजिक संस्थेचे अध्यक्ष तथा इंदिरा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष, महाविकास आघाडीचे तडफदार नेतृत्व, कामगारांचा बुलंद आवाज महेंद्रशेठ घरत यांच्या माध्यमातून दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट देवून नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. रविवारी हा दिमाखदार सोहळा दिघोडे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते. महेंद्र घरत यांनी ही दिलेली रुग्णवाहिका ही १३ वी भेट दिली असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

गावातील ग्रामस्थांच्या अडचणी म्हणजे आयत्या वेळी अचानक मोठ्या रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज भासते. दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी महेंद्र घरत यांच्या कानावर सदर बाब घातली असता महेन्द्रशेठ घरत यांनी क्षणाचाही विलंब न करता दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट म्हणून देण्याचे आश्वासन दिले. नुसते आश्वासन नाही तर रविवारी हे आश्वासन त्यांनी प्रत्यक्षात उतरविले.

सदर रुगणवाहिकेचे लोकार्पण महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिलिंद पाडगावकर, अखलाख शिलोत्री, डॉ.मनीष पाटील, महेंद्र ठाकूर, विनोद म्हात्रे, १८ गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, न्यू मेरिटाईम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष वैभव पाटील, सचिन घरत, माजी सरपंच अविनाश पाटील, विद्यमान सरपंच किर्तिनिधी ठाकूर, उपसरपंच अभिजित पाटील, कृष्णा पारिंगे, रेखा घरत आदी प्रामुख्याने उपस्थित होेते. सामाजिक चळवळीची बांधीलकी जपण्याची शिकवण मला आई यमुना हिने दिली आहे. पक्षीय राजकारण न बघता रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात जे समाधान आहे ते कशातच नाही, असेची महेंद्र घरत यांनी सांगताना आपले काम सेवेचे, कष्टकर्‍यांसाठीचे आहे हे कायम लक्षात ठेवा. लोकांचे काम होणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले.

महेंद्र घरत म्हणजे खऱ्या अर्थाने दानशूर व्यक्तिमत्त्व आहे. आजपर्यंत महेंद्र घरत यांनी करोडो रुपयांचे दान केले आहे. अनेक जणांना घरे, नोकऱ्या, मंदिरांना मदत, १२ रुग्णवाहिका, कोरोना काळात ४० लाख रुपयांचे धान्य त्यांनी गोरगरिबांच्या घरी देवून मदत केली. महेंद्र घरत यांच्या मतानुसार “राखतो तो राक्षस आणि देतो तो देव” म्हणून देवाने मला जे दिलं आहे ते राखण्यासाठी नाही तर देण्यासाठी आहे. माझी एकच इच्छा आहे, या जगात मला जितकं देता येतंय त्याहीपेक्षा अधिक देण्याची माझी क्षमता व्हावी अशीच प्रार्थना करतो.असे मत महेंद्र घरत यांनी याप्रसंगी व्यक्त केले.महेंद्र घरत यांच्या दानशूर व्यक्तीमत्त्वाबाबत काँग्रेस नेत्यांनी भरभरून बोलताना सांगितले की, जो माणूस कोणताही आमदार, खासदार नाही त्या माणसाकडे जर इतकी दानत असेल आणि जर तो आमदार झाला तर त्याच्या मतदार संघाचे तो सोने करू शकतो. महेंद्र घरत म्हणजे परीस आहे, तो ज्याला चिकटला त्याचे सोने झाले, असे सांगताना मिलिंद पाडगावकर यांनी उरण मतदार संघासाठी महेंद्र घरत यांना आमदारकीची उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही पक्षश्रेष्ठींकडे लेखी निवेदन देखील दिले आहे.

यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, तसेच महेंद्र ठाकूर आणि नंदराज मूंगाजी यांनी आपल्या भाषणात महेंद्र घरत यांनी उरण विधानसभेच्या आमदारकीची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. मात्र यावर महेंद्र घरत यांनी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, आम्ही महाविकास आघाडी म्हणून जेव्हा राज्यात काम करीत असतो, त्यावेळी जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराचे काम आपल्याला करायचे आहे. जागा वाटपाचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. रायगड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसच्या वाट्याला जागा उपलब्ध होतील त्याठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आपले सुद्धा आमदार निवडून येणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 8 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे