“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.”
बारा वर्ष रखडलेल्या रस्त्याचे काम अखेर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी झाले लोकांर्पण.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
उलवे नोड येथील सेक्टर १६ मधील गेल्या अनेक वर्षापासून मुख्य रस्त्याचे काम प्रलंबित होते. सिडको व्यवस्थापनाकडे अनेक बैठका घेऊन हा रस्ता पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्रकल्पग्रस्तांची घरे या रस्त्यामध्ये येत असल्या कारणाने त्यांना योग्य मोबदला मिळवून देण्या साठी त्यांनी प्रयत्न केले. गेले बारा वर्षापासून या मुख्य रस्त्याचे काम प्रलंबित होते.गेल्या महिन्यात या कामाला सिडको प्रशासनाने सुरुवात केली होती. या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी सर्वसामान्य जनतेसाठी जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.