श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा प्रथम वर्धापन दिनानिमित्त म्हाडा कॉलनी नविन कौठा ते श्रीराम मंदिर लातुर फाटा सिडको भव्य शोभायात्रा भाविक भक्त उत्साहात संपन्न

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटील,दि.22
नांदेड शहरातील म्हाडा कॉलनी नविन कौठा नांदेड येथे
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा प्रथम वर्धापन दिनानिमित्त म्हाडा कॉलनी नविन कौठा ते श्रीराम मंदिर लातुर फाटा सिडको भव्य शोभायात्रेत महिला तरूण मुलं मलीनी फेटा बांधून भक्तीमय गितावर नामघोषात,मुला,मुलींनी लाठी काठी प्रक्षिक्षण,शस्त्र शक्ती प्रदर्शन शोभायात्रा भाविक भक्ताचे मने जिंकली भावना भक्तांनी उत्साहात टाळ्या वाजवुन नामघोषणेने गलोगलीत शोभायात्रेत श्रीराम प्रभु ची सात फुटाची मुर्ती व समोर बंजरग हनुमानाची मुर्ती चे घरासमोर येताच पुजा करून दर्शन घेऊन स्वागत केले तर शोभायात्रेत प्रसाद घेऊन भाविक भक्त दुपारी बारा वाजता जागृत हनुमान मंदिर येथे आरतीसाठी नगरीचे नगरसेवक मा. राजु गोरे,शिवा लोट,व म्हाडा कॉलनी नविन कौठा येथील जेष्ठ नागरिक, महिला,पुरूष, नवतरूण विश्व हिंदू बंजरग दल, सकल हिंदू समाज बांधव सहभागी होते असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती दिली.