बहुजन समाज पार्टीचे उमेदवार सुनील मारुती गायकवाड यांचा जोरात प्रचार सुरू.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.11
उरण विधानसभा मतदारसंघात चुरशीचा लढा पहावयास मिळत असून उरण विधानसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. १४ उमेदवारांचाप्रचार सुरु आहे. उरण विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टी तर्फे सुनील मारुती गायकवाड (चिन्ह हत्ती) हे निवडणूक लढवत असून बहुजन समाज पार्टीचे सुनील गायकवाड हे प्रामाणिक एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ते असल्याने पक्षाचे तसेच विविध सामाजिक संस्था संघटनेचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.तळागाळात जाऊन गोरगरिबांना अनेकदा सुनील गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.उरण मधील विविध समस्या, प्रश्न विरोधात अनेकदा संप आंदोलन त्यांनी केले आहेत. विविध समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. विविध समस्यांचा शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे जनतेचा सुनील गायकवाड यांच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. उरण मध्ये शैक्षणिक समस्या आहेत, आरोग्य समस्या आहेत, विकासाचे अनेक कामे प्रलंबित आहेत त्या सोडवण्यासाठी मला बहुमताने निवडून द्या असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे उरण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनील मारुती गायकवाड यांनी जनतेला केले आहे.