राशनकार्ड ऑनलाईन करण्याची गजानन अनंतवार यांची महसूल प्रशासनाकडे मागणी

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.4
हदगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक राशनकार्ड ऑनलाईन नसल्याने कुटुंबातील अनेक सदस्यांचे नाव समाविष्ट नसल्याने ऑनलाईन नसल्याने काम करत असताना शैक्षणिक सुविधेसह कोणत्याही लाभासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ऑनलाईन नाव समाविष्ट करण्यासाठी आपल्या तहसील कार्यालयात अनेक अडचण निर्माण येत आहेत. परीणामी लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
प्रत्येक कामात राशनकार्ड महत्वपूर्ण ठरत असुन नाव समाविष्ट करणे आवश्यकच असल्याचे तालुक्यातील ग्रामीण भागाचा विचार करून राशनकार्ड धारकाची हेळसांड होणार नाही यासाठी हदगांव तालुक्यातील सर्कल किंवा महसूल विभागात शिबीर घेऊन राशनकार्ड धारकाचा महत्वपूर्ण विषय मार्गी लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त गजानन अनंतवार कवानकर यांनी तहसीलदार विनोद गुडंमवार यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.