राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त दिपउत्सव व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

छ.संभाजीनगर /प्रतिनिधी,दि.2
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रांजणगाव शे.पु. येथे शहीद मंजीतजी कोळेकर यांच्या संकल्पनेतून अखंडित चालू असलेला दीपोत्सव सोहळा मल्हार महासंघाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक रांजणगाव शे.पू येथे मोठ्या थाटात साजरा करण्यात आला तसेच मल्हार महासंघाच्या वतीने सामाजिक पत्रकार क्रीडा क्षेत्रातील विविध व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे तरी यावेळी उपस्थित मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास दादा कोळेकर प्रदेश उपाध्यक्ष संतोष जी थोरात प्रदेश संघटक रामेश्वर लव्हाळे मराठवाडा प्रमुख अनिल वाढोणकर मराठवाडा अध्यक्ष संजय जी फटाकडे मराठवाडा महिला आघाडीच्या प्रसिद्ध प्रमुख सौ. मिराताई जानराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असले सभापती अरुण भाऊ रोडगे रंगनाथ दादा राठोड शिवसेना तालुकाउप्रमुख विजय तोगे माजी सभापती गंगापूर उपस्थित होते त्यावेळेस समाजामध्ये सामाजिक पत्रकारिता व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल काही मान्यवरांना शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये सौ.साखराबाई तोगे सामाजिक कार्यकर्त्या राजू जंगले पत्रकार गजानन राऊत सामाजिक कार्यकर्ते सौ.सविताताई शिंदे बापूसाहेब पोकळे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ठेंग सर (राष्ट्रीय खेळाडू क्रीडा शिक्षक फादर जाकीयर मेमोरियल इंग्लिश स्कूल महालगाव) यांचा समावेश होता यावेळेस माजी सरपंच जोगेश्वरी सौ.छायाताई बोंबले व तसेच मल्हार महासंघाचे गंगापूर तालुका अध्यक्ष अमोल भाऊ तोगे उपाध्यक्ष अरुण तोगे साईनाथ मोरे व आधी पदाधिकाऱ्याची व सकल धनगर समाज समाज बांधवांची उपस्थिती होती