नवोपक्रमशील शाळा मराठवाडा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघरुळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

जितेंद्र गाडेकर, जालना,दि.04
जालना तालुक्यातील नवोपक्रमशील म्हणून प्रख्यात असणारी शाळा मराठवाडा पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघरुळ ता. जि. जालना या शाळेने विद्यार्थी हित व विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना नेहमीच वाव देण्याचा प्रयत्न आपल्या नवीन नवीन उपक्रमांमधून केलेला आहे. त्याचेच उदाहरण म्हणून आज दि.3/01/2025रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले . तसेच बालिका दिन व महिला मुक्ती दिन देखील साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी एकांकिका(मी ज्योतिबा बोलतोय, मी सावित्री बोलतेय )सादर केली. तसेच इतर विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योतीसावित्रीबाईंच्या कार्याचा उल्लेख करत भाषण केले.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन श्री. ऋषिकेश खरात यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रमुख यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले.