मतदार यादीचा द्वितीय संक्षिप्त विशेष पूनरिक्षण कार्यक्रमातंर्गत 1755 मतदान केंद्रावर अंतिम मतदार यादी प्रसिध्द

जालना/प्रतिनिधी,दि.30
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा व्दितीय संक्षिप्त विशेष पूनरिक्षण कार्यक्रमातंर्गत शुक्रवार दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, उप विभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, पाचही विधानसभा मतदारसंघातील 1 हजार 755 मतदान केंद्र व पदनिर्देशित ठिकाणी अंतिम मतदार यादीचे प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यायावतीकरण तसेच शुध्दीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जातो. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीच्या व्दितीय संक्षिप्त विशेष पूनरिक्षण कार्यक्रमातर्गत दि.6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी करण्यांत आली होती. दि. 6 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत जिल्ह्यात दावे व हरकतीची मोहिम राबविण्यात आली.
द्वितीय संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीत जिल्ह्यात 15 लाख 97 हजार 644 मतदारांची नोंद होती. तसेच 4 हजार 805 मतदारांच्या नावाची मयत, स्थलांतर व दुबार नाव यामुळे वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 26 हजार 299 मतदारांची निव्वळ वाढ होवून दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या 16 लाख 23 हजार 943 अशी झाली आहे. यात पुरुष मतदारांची संख्या 8 लाख 47 हजार 777 तर स्त्री मतदारांची संख्या 7 लाख 76 हजार 126 आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या 40 अशी झालेली आहे.
जिल्हाभरात विविध महाविद्यालये, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका तसेच विशेष मतदार नाव नोंदणी शिबीरांच्या माध्यमातून महिला मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री- पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण 908 वरुन 915 इतकी वाढ झाली आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 18 ते 19 वयोगटामध्ये 7 हजार 231 मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच 20 ते 29 या वयोगटात 14 हजार 199 मतदाराची वाढ झाली आहे. प्रारुप मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या 25 हजार 816 होती ती अंतिम मतदार यादीत 33 हजार 47 इतकी झाली आहे. तर 20 ते 29 वयोगटातील प्रारुप मतदार यादीत मतदारांची संख्या 3 लाख 31 हजार 728 होती ती अंतिम मतदार यादीत 3 लाख 45 हजार 927 झाली आहे. प्रारुप मतदार यादीत एकूण मतदारांची संख्या ही 15 लाख 97 हजार 644 होती ती अंतिम मतदार यादीत 16 लाख 23 हजार 943 इतकी झालेली आहे. विविध महाविद्यालयामध्ये आयोजित विशेष नाव नोंदणी शिबीरामुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येते.
दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळावर आणि जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, उप विभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय तथा सहा यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय आणि पाचही विधानसभा मतदार संघातील 1 हजार 755 मतदान केंद्र व पदनिर्देशित ठिकाणी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
मतदारांनी मतदार सेवा पोर्टल या संकेत स्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in), वोटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करुन मतदार यादीत आपले नाव तपासावे. या सोबतच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणार आहे. त्याठिकाणी जावून मतदाराने आपले नाव तपासून घ्यावे. जेणेकरुन आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024च्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणीचा नमुना अर्ज क्र.6 वोटर हेल्पईन ॲप, व्हीएसपी डॉट ईन या भारत निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर भरावा किंवा जवळच्या तहसिल कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने भरुन द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. तसेच सर्व राजकीय पक्षांनाही त्यांनी आवाहन केले आहे की,आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नियुक्त्या करुन त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस सहाय्य करावे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार संख्या
विधानसभामतदारसंघाचे नाव
दि 06 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या
दि 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादीतील मतदारांची संख्या
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार संख्या
विधानसभामतदारसंघाचे नाव |
दि 06 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या |
दि 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादीतील मतदारांची संख्या |
||||||||
|
पुरुष |
स्त्री |
तृतीय पंथी |
एकूण |
Gender Ratio |
पुरुष |
स्त्री |
तृतीय पंथी |
एकूण |
Gender Ratio |
परतूर |
163697 |
149355 |
0 |
313052 |
912 |
165541 |
152099 |
0 |
317640 |
919 |
घनसावंगी |
165433 |
151425 |
1 |
316859 |
915 |
168697 |
155952 |
1 |
324650 |
924 |
जालना |
175304 |
155563 |
35 |
330902 |
887 |
177384 |
159028 |
35 |
336447 |
897 |
बदनापूर |
169044 |
154360 |
4 |
323408 |
913 |
171063 |
157042 |
4 |
328109 |
918 |
भोकरदन |
163588 |
149835 |
0 |
313423 |
916 |
165092 |
152005 |
0 |
317097 |
921 |
एकूण |
837066 |
760538 |
40 |
1597644 |
909 |
847777 |
776126 |
40 |
1623943 |
915 |