बासर येथे ऐतिहासिक सामूहिक सरस्वती पूजन सोहळा विद्यारंभ सोहळ्याचे आयोजन

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.14
दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने दि16 व 17 जून रोजी श्री क्षेत्र बासर येथे सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळ्यांच्या आयोजन करण्यात आले आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विद्येची व बुद्धीची देवता म्हणून श्री सरस्वती मातेस प्रथम स्थान दिले आहे या सामूहिक सरस्वती पूजन सोहळ्यातून मुलांमध्ये भक्ती व मूल्य संस्कारांची शिकवण रुजवण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यात येणार आहे या उपक्रमात शालेय मुले युवा युती आणि पालक एकत्रपणे सामूहिक पद्धतीने सरस्वती मातेचे पूजन करणार आहेत दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने नेहमी समाज उपयोगी अशा 18 विभागाच्या माध्यमांतून विविध ज्ञान विनामूल्य जनसामान्य लोकापर्यंत पोहोचण्यात येते या सेवा कार्यातील बालसंस्कार विभागाच्या वतीने विविध उपक्रमातून व्यसनमुक्ती अंधश्रद्धा पर्यावरण जनजागृती गडकिल्ले संवर्धन असे अनेक विषयावर सामाजिक प्रबोधन करण्यात येते या श्री क्षेत्र बासर येथे 16 व 17 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक 16 तारखेला मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्याची उपस्थिती बासर या ठिकाणी लागणार असून इतर जिल्ह्यांनी 17 तारखेला सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळ्यासाठी उपस्थित राहायचे आहे या सोहळ्यासाठी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ मोरे यांची विशेष उपस्थिती राहणार असून या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने पालक आणि मुलांनी उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे