काजळा येथे ‘पोषण महा सप्ताह’ साजरा!

काजळा/प्रतिनिधी, दि.6
बदनापूर तालुक्यातील काजळा येथे आज दिनांक 6/09/2023 रोजी पोषण महा सप्ताह साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ महिला नागरिक सौ.द्वारका खोटे ह्या होत्या तर प्रमुख महणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.चव्हाण हे होते या वेळी कार्यक्रमाची सुरुवात डॉ चव्हाण यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली यावेळी महा पोषण सप्ताह निमित्ताने गावातील महिलानी खिचडी, लापशी, हरभरा ,फळे भाज्या, गरोदर मातेला लागणारा सकस संतुलित आहार यांचे प्रदर्शन भरविण्यात आले .महा पोषण सप्ताह हा महिणाभर राबविण्यात येतो.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. चव्हाण सर इद्रीससर, आरोग्य सेविका कामटे सिस्टर,डॉ दोडके सर अंगणवाडी सेविका चंद्रकला गुलगे, संगिता रुपनर,सविता शिर्के,मदतनिस संगिता सोन्नो प्रभावती ठोकळ,रामप्यारी मांगडे याच्या सह गावातील महिला मोठ्या संख्येने
उपस्थित होत्या.हा यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.