वैचारिक विचारांची पेरणी करत सशक्त भारत निर्मनासाठी अंबड येथे मौर्य क्रांती महासंघाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न
संस्थापक अध्यक्ष बलभीम माथेले यांच्या अध्यक्षेत लेखक संचित धनवे यांचे कार्यशाळेत अमूल्य मार्गदर्शन

अंबड/अनिल भालेकर,दि.16
जो समाज नवे बदल तथा गरजा लक्षात घेऊन स्वतःला अद्यावत ठरवतो तोच समाज आपले हक्क अधिकार मिळू शकतो व मिळालेले अधिकार शाबूत ठेवू शकतो तथा स्पर्धेच्या युगात नवनवीन कीर्तिमान स्थापित करत शशक्त भारताच्या निर्मितीत अमूल्य योगदान देऊ शकतो. हेच वास्तव्य लक्षात घेता मौर्य क्रांती महासंघाच्या वतीने अंबड शहरात एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करत विचारांची अमूल्य पेरणी करण्यात आली.
मौर्य क्रांती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बलभीम माथले यांच्या अध्यक्षस्थानी,महानायक खंडोबा ग्रंथाचे लेखक संचित धनवे यांनी मार्गदर्शक म्हणून अंबड शहरातील बुद्धिजीवी वर्गासाठी विचारांची मांदियाळी ठरलेले हे शिबिर अत्यंत प्रभावी व परिणामकारक ठरले.
विचारधारेचे महत्त्व, विचारधारेच्या अनुरूप वर्तन, फुले शाहू आंबेडकर विचारांचा मुख्य उद्देश,आधुनिक साधनांचा अतिवापर व दुष्परिणाम, पर्यावरणाचे महत्त्व व आपली नैतिक जबाबदारी,जाती निरपेक्ष लोक संघटन काळाची गरज, शैक्षणिक धोरण, बंधू भाव, समानता आदी महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शक करत संचित धनवे यांनी उपस्थित स्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
विचारांची कास धरत उज्वल भारताचे व आधुनिक युगातही आपल्या महापुरुषांचा आदर्श विचारांना स्मरणात ठेवून सामाजिक दायित्व जपले जाऊ शकते आणि हेच या कार्यशाळातून शिकायला मिळाली अशी भावना उपस्थित श्रोत्यांनी व्यक्त करत,संस्थापक अध्यक्ष बलभीमा माथेले व संचित धनवे यांचे आभार व्यक्त केले.