पुणे पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस आयकॉन स्पर्धेत पोकाँ. आकाश खरातचे राज्यातून सर्वद्विती

विरेगाव/गणेश शिंदे,दि.29
नुकत्याच पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र पोलीस आयकॉन कॉम्पीटीशन सन 2023-24 स्पर्धेत जालना येथील पोलीस अंमलदार आकाश संजय खरात यांनी राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे._
_या स्पर्धेत महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. जालना जिल्हयातील आकाश खरात यांनी स्पर्धेत सहभागी होऊन जिल्हयातील पोलीस खात्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याबददल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कार्यालय अधीक्षक एस. बी. तोटे, प्रबंधक एस.पी. जाधव व मंत्रालयीन कर्मचारी व पोलीस अंमलदार यांनीही त्यांचे स्वागत केले आहे. आकाश खरात हा सन 2013 या वर्षी पोलीस खात्यामध्ये भरती झालेला असुन त्यांना मॉडलींग या क्षेत्रात आवड असुन त्यांनी पोलीस खात्यामध्ये सेवा करत असतांना आपला छंद जोपासला. सध्या ते पोलीस अधीक्षक कार्यालय येथील प्रबंधक शाखा येथे कार्यरत असुन त्यांनी जिल्हयामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे._