भानेगाव सह परीसरात क्रांतीज्योती महात्मा फुले जंयती साजरी

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.28
हदगांव तालुक्यासह बरडशेवाळा पळसा मनाठा बामणी फाटा सह परीसरात क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालयासह ठिक ठिकाणी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भानेगाव येथे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी महेक शेख हीने भुषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी श्रावणी अक्कलवाड हीने केले. यावेळी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचे काम प्रथम दळवे, सम्राट पवार, पवन आलेवाड, गणेश जाधव, झिनत शेख यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.एन. मोरे , विषयक शिक्षिका श्रीमती डी.एल.कोठेकर व शाळेतील विद्यार्थी -विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.