कै.विठ्ठलराव मंगनाळे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन

नांदेड/प्रतिनिधी,दि.10
अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष व माजी अपंग कर्मचारी संघटनेचे कुशल माजी जिल्हाध्यक्ष कै.विठ्ठलराव मंगनाळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांना दोन मुली,एक मुलगा, जावाई, सुन,भाऊ नातलग आहे.
त्यांच्या मुळगावि कंधार तालुक्यातील तळ्याची वाडी येथे दि.१० जुलै २०२४ रोजी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हि बातमी दु:खद बातमी कळताच दिव्यांगाचा आधार व चळवळिची पोकळी निर्माण झाली असे दिव्यांग , वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दु:ख व्यक्त केले.
मंगनाळे सर एका पायाने दिव्यांग असुन ते जिल्हा परिषद नांदेड येथे नौकरी करीत असताना ते अपंग कर्मचारी संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून अनेक कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळुन दिला.पण बेरोजगार दिव्यांगाना सुध्दा न्याय हक्क मिळावा म्हणून मदत करीत होते.
शासकिय सेवेतुन निवृत झाल्यानंतर सुध्दा ते शांत न बसता अपंग क्रांती प्रहार संघटना मा. दिव्यांगाचे लढाऊ मंत्री मा. बच्चुभाऊ यांनी नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवड केली.
ते सर्वांचे मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे दिव्यांगाच्या दु:खांची जाणीव असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संघटनेला एकत्रित करुन अनेक प्रश्नांसाठी शासन प्रशासनास जागे करून दिनदुबळ्या दिव्यांगाना न्यायासाठी संघटित करून न्यायासाठी अनेक आंदोलने केली.संघर्षशिल नेता हरविल्यामुळे दिव्यांगाचे छत्र चळवळीची पोकळी निर्माण झाल्याचे दुःख चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी व्यक्त केले.
दिनदुबळ्याळ्या दिव्यांगासाठि संघर्ष करणाऱ्या कै.विठ्ठलराव मंगनाळे सराच्या आत्यास शांती मिळो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली