ब्रेकिंग
पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
0
3
1
8
7
6
जालना/प्रतिनिधी,दि.9
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योजना सन 2023-24 मधील विशेष घटक योजना दुधाळ शेळी गट (10+1) तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 100 एक दिवसीय कुक्कुट पक्षी वाटप योजनेसाठी अर्ज करण्यास प्रारंभ झाला असून पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दि.8 डिसेंबर 2023 पर्यंत https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईंड मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरील एएचडॉटमहाबीएमएस हे ॲप डाऊनलोड करुन त्यावर सादर करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0
3
1
8
7
6