pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित रहावे -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

· प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

0 3 1 8 6 7

जालना/प्रतिनिधी,दि.18

जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी म्हणून 9 हजार 855 अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण विधानसभानिहाय पाच ठिकाणी दोन सत्रात सोमवार दि.21 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. तरी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित रहावे, गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
जालना जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयामधील कार्यरत असलेल्या एकुण 14 हजार 720 अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरण्यात आली आहे. यामध्ये गट-अ 425, गट-ब 892, गट-क 12590 आणि गट-ड 813 असे एकुण 14720 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी पहिल्या प्रशिक्षणाचे आदेश 9 हजार 855 अधिकारी-कर्मचाऱ्यांना संबंधित तहसील कार्यालयाकडून तामिल करण्यात आले आहेत. मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी 2 व 3 यांच्यासाठी पहिल्या प्रशिक्षणात सोमवार दि.21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व दुपारी 2 ते 5.30 वाजेपर्यंत राहिल. मतदान अधिकारी 2 व 3 यांच्यासाठी सकाळच्या सत्रात प्रत्यक्ष यंत्र हाताळणीचे ज्ञान व दुपारच्या सत्रात प्रशिक्षण देण्यात येईल. तर मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष यांना सकाळच्या सत्रात प्रशिक्षण व दुपारच्या सत्रात प्रत्यक्ष यंत्र हाताळणीचे ज्ञान देण्यात येईल. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा कर्मचारी व्यवस्थापन समितीच्या नोडल अधिकारी नम्रता चाटे यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघात बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. प्रथम प्रशिक्षण 99- परतूर विधानसभा मतदारसंघासाठी परतूर येथील भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी नाट्यगृहात होणार आहे. 100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी घनसावंगी येथील राजेगाव रोडवरील मॉडेल महाविद्यालयात होईल. 101-जालना विधानसभा मतदारसंघासाठी जालना येथील देऊळगाव राजा रोडवरील सेंन्ट मेरी हायस्कुलमध्ये होईल. 102- बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी बदनापूर येथील साक्षी मंगल कार्यालयात होईल. आणि 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी भोकरदन येथील सिल्लोड रोडवरील समृध्दी लॉन्समध्ये आयोजन करण्यात आले आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 8 6 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे