शिवसेना पक्षाची सोशल मीडियावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उरण उपतालुका संघटिका व पालघर जिल्हा वक्ते मनीषा नितीन ठाकूर यांचा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केला गौरव

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
मनिषा नितिन ठाकूर शिवसेना महिला आघाडी उपतालुका संघटिका व जिल्हानिहाय वक्ता पालघर यांनी फेसबुक अकाउंटचे २५००० फॉलोवर्स व “साहेब ” या पेजचा १९७५० चा टप्पा आपल्या छोट्याश्या राजकीय कारकिर्दीत पार केला आहे. त्याच बरोबर लाखोंच्या संख्येत व्हू व हजारोंच्या संख्येने शेअर आणि लाईक केले जातात, त्याबद्दल बुधवार दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षाची सोशल मीडियावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उरण उपतालुका संघटिका व पालघर जिल्हा वक्ते मनीषा नितीन ठाकूर यांचा रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे
यावेळी आपली प्रतिक्रिया देताना मनीषा नितीन ठाकूर म्हणाल्या की, आज खरंच खूप अभिमान वाटत आहे कि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे कार्य व युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांची दूरदृष्टीपणा आणि समस्त निष्ठावंत शिवसेना नेत्यांची तळमळ हे सर्व मी सोशल मीडिया वर मांडायचे ईमानदारीत प्रयत्न केले आहे. आणि आपल्या पक्ष्याला खूप चांगला असा प्रतिसाद देखील मिळत आहे. आज सोशल मीडिया खूप महत्वाचे आहे. या माझ्या वाटचालीत जर मोलाचे कुणाचे आशिर्वाद, सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले असतील तर ते उरणचे लाडके कार्यसम्राट आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर साहेब,आणि मला ज्यांनी राजकारणात आणले ते उरण तालुकाप्रमुख संतोषजी ठाकूर साहेब आणि वेळोवेळी मला मार्गदर्शन करत असतात असे उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर साहेब, उरण नगराध्यक्ष गणेश शिंदे साहेब, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे साहेब, उपतालुका संघटक के.एम.घरत साहेब त्याच बरोबर उरण तालुक्यातील महिला आघाडी व निष्ठावंत शिवसैनिक त्याच बरोबर सिन्हाचा वाटा कुणाचा असेल कि ज्यांनी सोशल मीडिया जग काय असते हे शिकवले व माझ्या सोबत सावळी सारखे सतत पाठीशी उभे राहिले असे माझे पती नितिन लक्ष्मण ठाकूर व माझ्यातील गुण व निष्ठा ओळखून मला महाराष्ट्रात एक ओळख निर्माण करून दिली असे शिवसेना नेते खासदार राजन विचारे साहेब, शिवसेना डॅशिंग प्रवक्ते अनिश गाढवे साहेब, शिवसेना उपनेते प्रा.नितिन बानुगळे पाटील साहेब, शिवसेना उपनेते शरददादा कोळी साहेब या तमाम मान्यवरांचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहे तरीदेखील आपणासर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते व भविष्यात मला असेच आशिर्वाद रुपी मार्गदर्शन देत राहाल अशी मी आपणास विनंती देखील करते असे मत मनीषा ठाकूर यांनी व्यक्त केले. शेवटी त्यांनी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.