जालना येथील गुजराती विद्यालयात मुलांसाठी कायदेविषयक शिबीर संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि. 26
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सी.टी.एम.के. गुजराती विद्यालयात मुलांसाठी कायदेविषयक शिबीर संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, यांच्यासह उपपोस्ट मास्तर यु.पी.कुलकर्णी, बार्टीच्या समतादुत अनिता बोडखे, ॲङ महेश धन्नावत, मुख्याध्यापक सतिश देशमुख आदीची उपस्थिती होती.
यावेळी श्रीमती भारसाकडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा-2012 याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अमोल स्वामी यांनी भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत योजनांची माहिती दिली. समतादूत श्रीमती बोडखे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. बालकांचे हक्क आणि अधिकार काय आहेत याविषयी ॲड धन्नावत यांनी माहिती दिली.