माता सावित्रीआई फुले व राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या जयंती निमित्त भव्य सपर्धा परीक्षेचे आयोजन.

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.2
जालना, जालना तालुख्यातील वाघरूळ जहागीर येथे सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा तर्फे दिनांक ०७ जानेवारी २०२३
(रविवारी) रोजी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले आहे.
परीक्षेसाठी दोन गट पाडले असून, पाचवी ते दहावी साठी एक गट व दहावी पासून पुढील विध्यार्थ्याकरिता एक खुला गट आहे. दोन्ही गटातील विध्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असेल.
नोंदणी फी १०₹ असेल. यात चांगले गुण मिळवणाऱ्या मुलांना पुढील प्रमाणे बक्षीस दिल्या जाईल.
●खुला गट
प्रथम बक्षीस -२००१₹
द्वितीय बक्षीस -१५०१३
तृतीय बक्षीस -१००१₹
●पाचवी ते दहावी गट
प्रथम बक्षीस -११११₹
द्वितीय बक्षीस -७०१३
तृतीय बक्षीस -५०१₹
परीक्षा स्थळ : मराठवाडा पब्लिक स्कुल वाघरूळ जहागीर.वेळ : सकाळी ठीक नऊ ते दहा
नोंदणी साठी संपर्क : ८०१०६६५२०४/ ९७६७२५४३७६
तरी जास्तीत जास्त विध्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा.असे आवाहन सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक भिवा गाडेकर व प्रेस संपादक पत्रकार सेवा संघा चे जितेंद्र गाडेकर यांनी केले.