सुरंगली येथे आगळीवेगळी शिवजयंती मिरवणूक डी.जे. ला फाटा देत टाळ मृदंगाच्या गजरात भजनी मंडळ आणि मावळ्यांनी काढली पालखीत मिरवणूक.

भोकरदन/प्रतिनिधी, दि.20
भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे युवकांनी जालना जिल्हात एक आगळा वेगळा शिवजयंती उत्सव साजरा केला.पालखी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी सुवासणीनी आरती औक्षण केले. टाळ मृदंगाच्या गजरात डिजेविना , ही मिरवणूक काढण्यात आली. मागच्या वर्षी पण शिवजयंती उत्सव मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात आली. लहान मुलाला बाल शिवाजी महाराजांचे वेशभूषा करुन पात्र देण्यात आले होते.यासाठी शिवजयंती उत्सव समिती सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले. इतर गावांना व मावळ्यांना घालुन दिला आदर्श. विशेष म्हणजे शिव जयंती मिरवणूक विना पोलिस बंदोबस्त काढण्यात आली. पोलिस प्रशासनाने दखल घ्यावी असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे कार्य .