कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा यावर्षातील १४ वा पगारवाढीचा करार!
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील कामगारांसाठी पगारवाढीचा करार!

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28
रायगड जिल्ह्यातील
पनवेल -उरण तालुक्यामधे दानशुर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे तसेच कामगारांना सातत्याने न्याय देवून कामगारांचे जिवनमान उंचावणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना हि एकमेव संघटना आहे की संघटनेच्या माध्यमातून यावर्षी १४ कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करार करण्यात आले. यावर्षातील १४ वा पगारवाढीचा करार मे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ या व्यवस्थापनेतील मे. गॅड लॉजिस्टीक्स प्रा. ली., या कंत्राटाअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांसाठी करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना ४००० रुपये पगारवाढ, बोनस, रजा, मेडिक्लेम देण्याचे मान्य करण्यात आले आहे. केंद्रसरकारच्या डीपीडी धोरणामुळे सीएफएस मध्ये कामगार कपात होताना दिसत आहे.अशावेळी कामगारांचा रोजगार टिकवून ठेवण्याबरोबरच कामगारांच्या गरजा पूर्ण करण्याकरता पगारवाढ होणे सुद्धा आवश्यक आहे.कंपनी व कामगार यांची योग्य सांगड घालून कामगार नेते महेंद्रशेठ घरत आपल्या कार्यकौशल्याने सातत्याने कामगारांसाठी पगारवाढीचे करार करताना दिसत आहेत.
या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील , व्यवस्थापनातर्फे विलास वर्तक, वेळसकर. कामगार प्रतिनिधी चंद्रकांत ठाकू, प्रल्हाद ठाकूर, राजेश पाटील आदि उपस्थित होते.