सदर बाजार पोलीस ठाणे आणि
चंदनझिरा पोलीस ठाण्यासाठी नवीन जागेसह नूतन इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी पोलिस मित्र युवा महासंघाच्या शिष्टमंडळाने आ. कैलास गोरंटयाल यांच्याकडे आज सोमवारी केल्यानंतर त्यांनी उपरोक्त ग्वाही दिली. यावेळी युवा नेते अक्षय गोरंटयाल यांचीही उपस्थिती होती. जालना शहरतील रामनगर परिसरामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसाठी शासकीय पोलीस वसाहत असून तेथे जवळपास ३०० निवासस्थाने ही सुमारे ६४ वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहेत. याशिवाय चार इमारतीमध्ये ९६ निवासस्थान असून सदरील निवस्थानांची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असल्याचे आ. कैलास गोरंटयाल यांच्या निदर्शनास आणून देत निवासस्थानाचे छताचे प्लास्टर पडले, भिंती कोसळल्या असून सिमेंटची पत्रे कुजली, सांडपाणी व्यवस्था सतर वर्षे जुनी असल्याने कुचकामी ठरली आहे.
सदर वसाहत परिसरात ज्या चार उभारण्यात आल्या आहेत. तेथील सांडपाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. इमारतीच्या भिंतीवर झाडे उगवली असून इमारतीस कमकुवत करत आहेत. मात्र, या सर्व समस्यांना तोंड देत पोलीस कर्मचारी या वसाहतीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहत असल्याचे पोलिस मित्र युवा महासंघाच्या शिष्टमंडळाने सांगितले. पोलीस वसाहतीचे जुने बांधकाम पाडून तेथे आवश्यक त्या सुविधांसह नवीन इमारत बांधकाम करण्यात यावे.
जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हे मध्यवती ठिकाणी असून या ठाण्याला चार पोलीस चोकी संलग्नित आहेत. या पोलीस ठाण्या अंतर्गत असलेली लोकसंख्या सुमारे दोन ते अडीच लाख इतकी आहे. शहरातील सर्वसामान्य जनता आपले प्रश्न घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येत असतात परंतु जागेच्या अभावामुळे पार्किंगची समस्या निर्माण होते.पोलीस ठाण्यात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या व पोलीस ठाण्या अंतर्गत दाखल गुन्ह्यांच्या संख्येचा गांभीर्याने विचार करून सदर बाजार पोलीस ठाण्याच्या जुन्या वास्तूच्या जागी नवीन इमारतीचे बांधकाम करावे,
यासोबतच औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरामध्ये पोलीस ठाण्याला नवीन जागा उपलब्ध करून तेथे पोलिसांसाठी नवीन इमारतीचे निर्माण करावे, अशी मागणीही य शिष्टमंडळाने आ. कैलास गोरंटयाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.