ब्रेकिंग
सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0
3
1
8
6
2
जालना/प्रतिनिधी,दि.3
राज्य शासनाकडून ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत जोडणी नाही अशांना दिवसा सिंचन करण्यासाठी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करु शकतात. छत्रपती संभाजीनगर येथील महाऊर्जा विभागीय कार्यालयाअंतर्गत दि.27 सप्टेंबर, 2024 रोजीपर्यंत 24 हजार 260 सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आले असून 17 हजार 945 सौर कृषी पंपाचे काम प्रगतीपथावर आहे. 5 हजार 216 शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. तरी शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरुन सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
0
3
1
8
6
2