उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालन्यात!

जालना/प्रतिनिधी,दि.25
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे
शनिवार दि.25 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता एसआरपीएफ हॅलिपॅड जालना येथे आगमन व मोटारीने दत्ताश्रमकडे प्रयाण. सायंकाळी 4.10 वाजता दत्ताश्रम जालना येथे आगमन व दर्शन. सायंकाळी 4.40 वाजता आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. सायंकाळी 4.55 वाजता बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सायंकाळी 5.10 वाजता मोटारीने आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी प्रयाण. सायंकाळी 5.20 ते 5.45 वाजेपर्यंत आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सायंकाळी 5.45 ते 6.30 यावेळेत इतर कार्यक्रम व पदाधिकाऱ्यांसाठी राखीव. सायंकाळी 6.30 वाजता मोटारीने आझाद मैदान जालनाकडे प्रयाण. सायंकाळी 6.45 वाजता आझाद मैदान येथे आगमन. सायंकाळी 6.45 वाजता जाहिर सभेस उपस्थिती. सायंकाळी 7.30 वाजता मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.